Table of content:
1) प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना काय आहे? 2) प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेअंतर्गत कोणत्या उद्योगांना कर्ज मिळेल? 3) किती लाखापर्यंत कर्ज मिळेल? 4) योजनेसाठी लागणारे कागदपत्रे? 5) योजनेसाठी अर्ज कसा करायचा? की |
20 लाखापर्यंत कर्ज मिळणार अर्ज कसा करायचा संपूर्ण माहिती वाचा.
आजकाल तरुण नोकरी न करता व्यवसायाकडे वळत आहे. यामुळे ही गरज ओळखून सरकारने प्रधानमंत्री मुद्रा योजना सुरू केली. या योजनेची मर्यादित रक्कम 10 लाख रुपये होती पण नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात ही रक्कम वाढवण्यात आली आहे ही रक्कम 20 लाख रुपये करण्यात आली आहे. यामुळे देशात व्यवसाय सुरू करू इच्छितांसाठी संधी उपलब्ध झाली आहे.
प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना काय आहे ?
या योजनेअंतर्गत 1 ते 5 वर्षाच्या परत फेडीवर कर्ज मिळते. व्यवसाय वाढीसाठी तीन विविध टप्प्यावर कर्ज मिळते. कर्जाचा प्रकार आणि लागू असलेल्या पंतप्रधान मुद्रा योजनेचा व्याजदर आकारला जातो. तरुणांना व्यवसाय करण्यासाठी सुलभपणे कर्ज मिळावे यासाठी ही योजना 8 एप्रिल 2015 रोजी सुरू करण्यात आली या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत कर्ज मर्यादा ही फक्त दहा लाख रुपये होती पण नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात ही रक्कम वाढवण्यात आली आहे. ही रक्कम वाढवून 20 लाख रुपये करण्यात आली आहे त्यामुळे देशातील तरुणांना व्यवसाय करण्यासाठी संधी निर्माण झाली आहे.
प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेअंतर्गत कोणत्या उद्योगांना कर्ज मिळेल?
ही योजना आर्थिक दृष्ट्या गरीब असणाऱ्या तरुणांसाठी तयार केलेली आहे या योजनेअंतर्गत तरुणांना व्यवसाय सुरू करता यावा यासाठी कर्ज दिले जाते. या योजनेअंतर्गत बिगर कॉर्पोरेट लघु शेती बिगर शेती या उद्योगांना कर्ज दिले जाते हे कर्ज 20 लाखापर्यंत दिले जाते. हे कर्ज ठराविक काळानंतर परत करावे लागते.
किती लाखापर्यंत कर्ज मिळेल?
ही योजना ज्या लोकांना व्यवसाय सुरू करायचा आहे पण भांडवल नाही त्या लोकांसाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत तरुणांना 10 लाखापर्यंत कर्ज दिले जात होते. पण नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात देशाच्या अर्थमंत्री यांनी घोषणा केली आहे की योजनेच्या कर्जाची रक्कम 10 लाखावरून वीस लाख करण्यात आली आहे.
योजनेसाठी लागणारी कागदपत्रे:
1) आधार कार्ड
2) पॅन कार्ड
3) पासपोर्ट फोटो
4) 3 महिन्यातील बँक स्टेटमेंट
5) ऍड्रेस प्रूफ
योजनेसाठी अर्ज कसा करायचा?
या योजनेसाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन या दोन पद्धतीने अर्ज करू शकतो.http://www.mudra.org.in/ऑनलाइन अर्ज करण्यासाठी या वेबसाईटला भेट द्या. व ऑफलाईन आमचं करण्यासाठी आपल्या जवळच्या बँकेची संपर्क साधा
Leave a Reply